फक्त १० देशात चालणार आयफोनचे ई सिम फिचर

iphone
अॅपलने प्रथमच ड्युअल सीम फिचर असलेले आयफोन एक्स एस, एक्स एस मॅक्स आणि एकस आर बाजारात आणले असून त्यात ई सीम सुविधा दिली आहे. मात्र जगभरात केवळ १० देशातच हि सेवा युजर वापरू शकणार आहेत. ई सिम व्हर्चूअल सिम आयडी टेलिकॉम ऑपरेटर द्वारा दिली जाणारी सेवा असून हे सिम स्मार्टफोन, स्मार्टवॉचच्या आयएमइआय नंबरवर नोंदविले जाते यामुळे युजरला वेगळे सिम खरेदी करण्याची गरज राहत नाही.

अर्थात या सेवेबाबत एक समस्या अशी आहे कि भारतात समजा ई सीम व्यवस्थित चालले तर ते भारताबाहेर चालेलच असे नाही. सध्या जगात फक्त १० देश हि सेवा देत आहेत. आयफोन मधील हे सिम ऑस्ट्रिया, कॅनडा, क्रोयेशिया, चेक गणराज्य, जर्मनी, हंगेरी, भारत, स्पेन, युके आणि युएस मध्ये चालेल. भारतात हि सुविधा फक्त एअरटेल पोस्टपेड आणि रिलायंस जिओ ग्राहकांना मिळते आहे तर स्पेन मध्ये व्होडाफोन ग्राहकांना मिळते आहे.

Leave a Comment