देशाच्या ९८ शहरात सुरु होणार स्वस्त कॅब सेवा

cabser
आसामच्या गोहाटी येथील स्टार्टअप वायफाय कॅबने देशातील ९८ स्मार्टसिटी म्हणून निवड झालेल्या शहरात स्वस्त कॅब सेवा सुरु करण्यात येत असल्याची घोषणा केली असून ५ रु.प्रती किलोमीटर दराने हि सेवा पुरविली जाणार आहे. त्याचबरोबर अन्य कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांप्रमाणे पिक टाईमसाठी तसेच रात्रीच्या सेवेसाठी जादा दर आकारले जाणार नाहीत असे स्पष्ट केले गेले आहे.

शुक्रवारी या संदर्भात करण्यात आलेली घोषणेनुसार अँपायरिंग आयडीयाज अँड फ्युचर टेक सोल्युशनचे मृदुल दास म्हणाले आम्ही २ हजार कॅब पासून या सेवेची सुरवात करत आहोत. दुर्गापूजेपासून प्रथम गोहाटी येथे हि सेवा सुरु केली जाईल. आम्ही अँब्यूलंस सेवाही सुरु करणार आहोत. त्यासाठी विविध हॉस्पिटल आणि खासगी अँब्यूलंस मालकांबरोबर करार करण्यात येणार आहेत. आम्ही आमच्या नफ्यातील काही रकमेतून रस्ते बांधणीसाठी मदत करण्याची योजनाही आखली आहे.