अॅपलच्या लोगोत म्हणून आहे अर्धे खाल्लेले सफरचंद

जगभरात बहुतेक सर्व स्मार्टफोन प्रेमींचे आपल्यकडेही आयफोन असावा असे स्वप्न असते इतकी लोकप्रियता या फोनने मिळविली आहे. नुकतेच कंपनीने तीन नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. महाग असूनही या फोनची मागणी जबरदस्त आहे. या कंपनीने त्यांचा लोगो म्हणून खाल्लेले सफरचंद निवडले आहे. अर्थात त्यामागे काही कारण आहे.

असे समजते कि १९७७ साली जेव्हा रॉब जेनोफ याने हा लोगो तयार केला आणि स्टीव जॉब्सला दाखविला तेव्हा त्याला तो एकदम पसंत पडला. हा लोगो संगणक विज्ञानतज्ञ एलन टर्निंगची आठवण म्हणून बनविला गेला होता. १९५४ मध्ये एलनचा अचानक मृत्यू झाला होता तेव्हा त्याच्या मृतदेहाजवळ अर्धवट खाल्लेले विषारी सफरचंद मिळाले होते. तसेच जेनोफचे असेही मत होते कि सफरचंद हे असे एकमेव फळ आहे जे अर्धवट खाल्ले असले तरी चित्रात ओळखता येते.

जॉब्सने कंपनीचे नाव अॅपल असे का ठेवले यामागे असे कारण सांगतात कि जॉब्सची एक सफरचंदाची बाग होती आणि तेथे तो खूप वेळ घालावीत असे. त्यामुळे कंपनी सुरु करायची ठरल्यावर नाव कोणते ठेवायचे या यादीत अॅपलचा क्रमांक वरचा होता.
logo

Leave a Comment