‘जलेबी’चे पहिले रोमँटिक गाणे रिलीज

jalebi
महेश भट्ट यांची निर्मिती संस्था असलेल्या विशेष फिल्म्स आणि अभिनेत्री रेहा चक्रवर्ती आणि वरुण मित्रा यांचा आगामी चित्रपट ‘जलेबी’चा ट्रेलर आणि पोस्टरची बरीच चर्चा झाली. यानंतर आता नुकतेच या चित्रपटातील पहिले रोमँटिक गाणे ‘पल’ रिलीज करण्यात आले आहे.

‘जलेबी – द एवरलास्टिंग टेस्ट ऑफ लव्ह’ चित्रपटाचे हे पहिले गाणे असून चित्रपटाचे पोस्टर याआधी प्रदर्शित केले होते ते कोरिअन वॉर चित्रपटाची हूबेहूब कॉपी केली असल्याची चर्चा झाली होती. अरिजीत सिंग आणि श्रेया घोषालने ‘पल’ हे गाणे गायले आहे. पुष्पदिप भारद्वाज या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट १२ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.