व्हिडिओ; चुकीच्या पद्धतीने कतरिनाने केली गणपतीची आरती

katrina-kaif
सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूडच्या कलाकारांनाही गणरायाच्या आगमनाची आतुरता होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अभिनेता सलमान खानने घरी बाप्पाची स्थापना केली. गणेश पुजनासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी त्याच्या घरी हजेरी लावली. कतरिना कैफची उपस्थिती या सर्वांमध्ये विशेष ठरली. त्यात गणपतीची उलटी आरती केल्याने ती सोशल मीडियावर ट्रोल झाली.


कतरिनाने सलमानच्या कुटुंबासोबत गणरायाची आरती केली. पण कतरिना ही आरती उलट्या पद्धतीने करताना दिसली. आरती करताना पुजेची ताट डावीकडून उजवीकडे गोल फिरवले जाते. पण ती चक्क उजवीकडून डावीकडे आरतीचे ताट फिरवत होती. यावेळी हे कुणाच्या लक्षात आले नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यावर चुक लक्षात आली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यामुळे कतरिनाला तुफान ट्रोल केले जात आहे.

अभिनेता अरबाज खान, सोहेल खान त्यांची आई यावेळी उपस्थित होती. तसेच बहिण अर्पिता खान तिच पती आयुष शर्मासोबत दिसली. कतरिना आरती करत असताना चाहत्यांची नजर तिच्या आरतीच्या ताटावर पडली आणि तिच्यावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली.