उदय चोप्राची अजब मागणी; म्हणतो भारतात आरोग्यदायी ‘गांजा’ वैध करा

uday-chopra
अभिनेता उदय चोप्राने भारतात गांजा वैध ठरवण्यात आला पाहिजे असे मत व्यक्त केले असून महसूल मिळवण्याचा हा एक मोठा स्त्रोत आहे आणि हे वैद्यकिय क्षेत्रातही फायद्याचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

आपल्या ट्विटरवर अभिनेता उदय चोप्राने, भारतात गांजा वैध केला पाहिजे, असे मला वाटते. हा आपल्या संस्कृतीचा एक भाग असून जर याला वैध ठरवण्यात आले आणि त्यावर कर बसवला तर हा महसूल मिळवण्याचा मोठा स्रोत होऊ शकतो. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, याचे खूप काही वैद्यकिय लाभ आहेत. दिग्गज चित्रपट निर्माते यश चोप्राचा मुलगा असलेला अभिनेता उदय स्वतः गांजाचे सेवन करीत नाही. परंतु याला वैध ठरवणे बुध्दीमत्तेचे पाऊल ठरेल असे त्याला वाटते.