गणेशोत्सवादरम्यान डॉल्बी आणि डीजेच्या वापरावर सरसकट बंदी – उच्च न्यायालय

high-court
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने गणपती उत्सवादरम्यान डीजे आणि डॉल्बीच्या वापराला परवानगी नाकारली असून न्यायालयाने यासंदर्भात राज्य शासनाला डॉल्बी आणि डीजेच्या वापरावर सरसकट बंदी घालावी का म्हणून आपला पक्ष ठेवण्यास सांगितले असल्यामुळे पारंपरिक वाद्ये यंदाच्या गणपती उत्सवात अधिक वाजवली जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत डीजे आणि डॉल्बीच्या वापरावर बोलताना म्हटले, की हे सणवार दरवर्षी एका मागून एक येतच राहणार. पण नागरिकांना डीजे-डॉल्बीच्या माध्यमातून होणारा त्रास, ध्वनी प्रदूषण आणि डेसिबल मर्यादेचे उल्लंघन याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. डॉल्बी आणि डीजे यांच्यावर सरसकट बंदी घालणे कितपत योग्य असून या बद्दल राज्य शासनास काय वाटते हे जाणून घेण्यासाठी येत्या १९ सप्टेंबरला राज्य शासनास न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.