रिलायन्स पेट्रोलपंप २० रुपयांनी स्वस्त विकणार पेट्रोल

Untitled-1
जिओच्या कमालीच्या स्वस्त दराने टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडविल्यानंतर रिलायंस उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता इंधन क्षेत्रात दर युद्ध सुरु करण्याच्या विचारात आहेत. रिलायंस पुन्हा एकदा पेट्रोल पंप व्यवसायात जोरदार सुरवात करत असून या पंपांवर अन्य कंपन्याच्या तुलनेत लिटरमागे २० रु. कमी दराने पेट्रोल विकले जाणार आहे. यामुळे या क्षेत्रातील अन्य कंपन्यांना दर कमी करणे भाग पडेल असे सांगितले जात आहे.

अर्थात रिलायंसच्या पंपांवर मिळणारे पेट्रोल पंप कुठे आहे त्यानुसार स्वस्त विकले जाणार असून हा दर बाजारभावापेक्षा १० ते २० रु. कमी असेल. सरकारी तेल कंपन्यांनी देशात आणखी २५ हजार नवे पंप सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यात सर्वाधिक पंप इंडिअन ऑइल कडून सुरु केले जाणार आहेत. खासगी क्षेत्रात एस्सार त्यांच्या पंपांची संख्या ५ हजारावर नेणार आहे. रिलायन्सचे १४०० पंप आहेत ते काही काळापूर्वी बंद केले गेले होते मात्र त्यातील ११०० पंप पुन्हा सुरु केले गेले आहेत.

देशात इंडिअन ऑइलचे २५६२७, भारत पेट्रोलियमचे १३६१९, हिंदुस्तान पेट्रोलियमचे १३९७८, एस्सारचे ३३०० आणि रिलायन्सचे १४०० पेट्रोल पंप आहेत.

Leave a Comment