आता दिव्यांगही घेऊ शकणार कार ड्रायविंगचा आनंद

wheel
दिव्यांग लोकांचे जग बदलू शकेल अशी एक कार हंगेरीतील केन्गस कंपनीने तयार केली असून दिव्यांग कोणाच्याही मदतीशिवाय हि कार चालवू शकणार आहेत आणि ड्रायविंगचा अनुभव आणि आनंद घेऊ शकणार आहेत. या कार मध्ये दिव्यांग त्याच्या व्हीलचेअरसह सहज प्रवेश करू शकणार आहेत.

ही व्हीलचेअर इलेक्ट्रिक कार अन्य कार मध्ये चालकाला मिळणाऱ्या सर्व सुविधा दिव्यांगाना मिळू शकणार आहेत. कारला मागच्या बाजूला मोठा दरवाजा दिला गेला आहे. हा दरवाजा रिमोटच्या सहाय्याने वरच्या बाजूला उघडला जातो आणि दिव्यांग त्यांच्या व्हीलचेअर सह सहज आत जाऊ शकतात. कारला दोन किलोवॅटची बॅटरीवर चालणारी मोटार आहे आणि कारचा सर्वाधिक वेग आहे ताशी ४५ किमी. स्टिअरिंग व्हीलच्या जागी मोटर बाईक प्रमणे हँडलबार असून दिव्यांग व्हीलचेअरवर बसून सहज ही कार चालवू शकतील.

ही कार फुल चार्जवर ७० ते ११० किमी अंतर कापू शकणार असून अमेरिकेत तिची किंमत २५ हजार डॉलर्स आहे. भारतात हि कार कधी येणार याची माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Comment