पतंजलीचे गाय दुध बाजारात दाखल

cowmilk
पतंजली आयुर्वेद तर्फे योगगुरू रामदेवबाबा यांच्या हस्ते मंगळवारी गाईचे दुध, पनीर, टाक, दही यासह अनेक नवी उत्पादने सादर करण्यात आली असून हे दुध बाजारभावापेक्षा कमी किमतीत ग्राहकांना मिळणार आहे. नव्याने सादर झालेली सर्व उत्पादने बाजारभावापेक्षा ५० टक्के कमी दरात विकली जाणार आहेत. गाईचे दुध लिटरला ४० रुपयांनी मिळणार आहे.पाहिल्याचे दिवशी ४ लाख लिटर दुध विक्रीसाठी उपलब्ध केले गेले आहे.

दुग्धपदार्थांच्या बरोबरीने गोठविलेले मातर, अन्य भाज्या, स्वीट कॉर्न, फ्रेंच फ्राईज, तसेच पशु खाद्य आणि दिव्य जल हि उत्पादनेही बाजारात आणली गेली आहेत. पुण्यात त्यासाठी ८ हजार तर मुंबईत १० हजार रिटेलर्स नेमले गेले आहेत. या उत्पादनातून १ हजार कोटींची उलाढाल करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.

दुभत्या जनावरांसाठी युरिया मुक्त पशु खाद्य पतंजलीने तयार केले असून दिव्यजल २५०,५०० मिली तसेच १, २, ५ आणि २० लिटरच्या बाटल्यातून उपलब्ध केले गेले आहे.

Leave a Comment