ऑडीच्या इलेक्ट्रिक एसयुव्ही ईट्रॉन चा टीझर रिलीज

etron
जर्मन कार उत्पादक कंपनी ऑडीने त्यांच्या नव्या इलेक्ट्रिक एसयुव्ही ईट्रॉनचा टीझर रिलीज केला असून येत्या १७ सप्टेंबरला अमेरिकेत होणाऱ्या एक खास कार्यक्रमात तिचा डेब्यू केला जाणार आहे. संपूर्ण इलेक्ट्रिक असलेली कंपनीची ही पहिलीच कार आहे.

या एसयुव्हिला दोन इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या गेल्या असून आठ सेकंदाचा बुस्ट मोड दिला जाणार आहे. या कारचा टॉप स्पीड २०० किमी असून सिंगल चार्जवर ही कार ४०० किमी अंतर कापेल असा कंपनीचा दावा आहे. या गाडीला ९५ किलोवॅटचे बॅटरी पॅक फ्युएल सेल, अॅडव्हांस रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम दिली गेली आहे. इंटिरियर फ्लॅग ए ८ प्रमाणे आहे. ३ स्पोक मल्टी फंक्शनल स्टींअरिंग व्हील, व्हरच्युअल इन्स्ट्रुमेन्ट् क्लस्टर, सेंटर कन्सोल मध्ये दोन स्क्रीन, मागच्या भागात एलईडी टेल लॅम्प, नवे बम्पर डिझाईन दिले गेले आहे.

Leave a Comment