अॅपलचे तीन ड्युअल सिम स्मार्टफोन लाँच

iphone
कॅलिफोर्निया – आयफोन Xs, आयफोन Xs Max आणि आयफोन Xr असे तीन नवे मोबाईल फोन बुधवारी पार पडलेल्या ‘अ‍ॅपल’चा इव्हेंटमध्ये अॅपलने लाँच केले आहेत. या नव्या फोन्सचे अनावरण अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अॅपलने मोबाइल फोनसोबतच नवीन घड्याळही बाजारात आणले आहे.

नवीन आयफोन कॅलिफोर्नियातील अ‍ॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स सभागृहामध्ये लाँच करण्यात आले. अॅपलने एकाच वेळी तीन आयफोन, मॅकबुक एअर-२, अ‍ॅपल वॉच-४, एअरपॉड-२ आणि फेस-आयडी तंत्रज्ञान असलेला आयपॅड लॉन्च आज लाँच केला. या आयफोन्सची किंमत जवळपास ७४ हजारांच्या घरात असेल. फेस आयडी हे तिन्ही मोबाइलचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या फिचरमुळे चेहऱ्याच्या आधारे फोन अनलॉक करता येणार आहे. तसेच विशेष म्हणजे या फोनमध्ये ड्युअल सिमची सुविधा देण्यात येणार आहे. लवकरच बाजारात आयफोन एक्स एस हा दाखल होण्याची शक्यता आहे.

७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा Phone Xs आणि iPhone Xs Max ला देण्यात आला आहे. तसेच ड्युल रियर कॅमेरा दोन्ही आयफोनला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यापैकी एक वाइड अँगल सेन्सर तर दुसरा टेलिफोटो लेन्स असणार आहे. दोन्हीचे सेन्सर्स OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशन)असणार आहेत. तसेच रेटिना डिस्प्लेसह थ्रीडी टच फीचर देण्यात आले आहे.

लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी असे तीन हार्ट फिचर अॅपलच्या नव्या घड्याळामध्ये देण्यात आले आहेत. म्हणजेच या घड्याळाद्वारे हृदयाचे ठोके मोजता येणार आहेत. तसेच नव्या अॅपल वॉच सिरीज ४ मध्ये आधीपेक्षा ३० टक्के मोठी स्क्रीन आहे. ईसीजीची देखील सुविधा यात असल्यामुळे भारतात अॅपल वापरणाऱ्यांच्या संख्येत साधारण २ टक्क्यांनी वाढ होईल असे कंपनीचे मत आहे. तसेच हे आयफोन पहिल्या आयफोनपेक्षा ३० टक्के अधिक वेगवान असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Leave a Comment