काही देशात ६१ पैसे तर काही देशात १५० रु. लिटरने मिळते पेट्रोल

petrol
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीं गगनाला भिडल्या आहेत त्यातच रुपया कोसळत असल्याने केंद्र सरकारपुढे मोठेच आव्हान उभे ठाकले आहे. जगभरातील देशांच्या अर्थकारणात महत्वाची भूमिका बजावत असलेल्या या इंधनाचे भाव प्रत्येक देशात वेगळे आहेत. कुठे ते पाण्यापेक्षाही कमी आहेत तर कुठे चांगलेच चढे आहेत.

भारतात पेट्रोलने ८० रु.लिटर ची पटली ओलांडली आहे तर हाच दर शेजारी पाकिस्तान मध्ये ५४ रु.लिटर आहे. पेट्रोल चा सर्वाधिक दर लिटरला १४६ रुपये १० पैसे आईसलंड मध्ये आहे तर नॉर्वेमध्ये हाच दर १४५.४९ रु.आहे. नेदरलंड मध्ये पेट्रोल लिटरला १४०.३० पैसे किमतीला विकले जात आहे तर कॅरेबीयन देश बार्बाडोस मध्ये हाच दर १४०.१६ इतका आहे.

जगात सर्वाधिक स्वस्त दराने पेट्रोल आर्थिक कंगालखोर झालेल्या व्हेनेझुएला देशात विकले जात असून येथे लिटरला ६१ पैसे दराने पेट्रोल विकले जात आहे. कच्च्या तेलाचा प्रमुख उत्पादक देश इराण मध्ये पेट्रोल २०.४७ पैसे लिटर असून आफ्रिकी देश सुदान मध्ये हा दर २४.५१ पैसे, कुवेत मध्ये २४.९० पैसे तर अल्जिरीया मध्ये २५.४९ पैसे असा आहे.

Leave a Comment