१४ हजार रुद्राक्षातून साकारली शिवाजी महाराजांची प्रतिमा

rudraksha
मुंबईतील कलाकार चेतन राउत यांनी त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची एक अनोखी प्रतिमा साकारून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव कोरले आहे. हि प्रतिमा १४ हजार रुद्राक्षाचा वापर करून साकारली गेली असून त्यात २८ रंगांच्या शेड वापरल्या गेल्या आहेत. हे चित्र मोझेक प्रकारातील आहे.

चेतन यांच्या साठी शिवाजी राजे दैवत आहेत. ते म्हणाले आज देशात जाती धर्मावरून तणाव निर्माण होतो आहे पण आजच्या तरुणांनी या बाबत शिवाजी राजांचे चरित्र जाणून घेतले पाहिजे. शिवाजी राजे सर्व जाती धर्माचा आदर करत असत. त्यांच्या राज्यात भेदाभेद नव्हता. तसेच आजच्या युवकांनी शिवाजी राजे यांचे व्यवस्थापन कौशल्य शिकले पाहिजे, त्यांचा दृष्टीकोन अभ्यासाला पाहिजे.

रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ असून त्याला अध्यात्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला महादेवाचे अश्रू म्हटले जाते. महादेवाच्या डोळ्यातून रुद्राक्षाची निर्मिती झाली असे मानले जाते. रुद्र म्हणजे महादेव आणि अक्ष म्हणजे डोळा. या दोन शब्दापासून हा शब्द तयार झाला आहे. प्राचीन काळापासून रुद्राक्ष माळा वापरल्या जात असून त्याचा उपयोग दागिन्याठी करतात. रुद्राक्षातून एक प्रकारची स्पंदने येतात ज्य्मुळे उर्जेचे सुरक्षा कवच निर्माण होते. शांती मिळावी म्हणूनही रुद्राक्ष वापरला जातो.

Leave a Comment