सर्जिकल स्ट्राईकमध्ये वापरले गेले होते बिबट्याचे मलमूत्र

rajendra
पाकिस्तानी हद्दीत जाऊन भारतीय सेनेने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक ला दोन वर्षे होत असताना या साहसी मोहिमेतील एक मनोरंजक कथा या ऑपरेशनचे प्रमुक, त्यावेळी नौशेरा येथे कोर कमांडर असलेले ले. ब्रिगेडीअर राजेंद्र निभोडकर यांनी पुण्यात मंगळवारी बोलताना सांगितली. निम्भोडकर यांचा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान तर्फे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.

उरी येथिल लष्करी तळावर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून पाकव्याप्त काश्मीर मध्ये भारतीय सेनेने २८ सप्टेंबर २०१६ ला सर्जिकल स्ट्राईक करून तेथील दहशतवादी लाँच पॅड उधवस्त करून २९ जणांना कंठस्नान घातल्याची घटना अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. या संबंधातील कथा सांगताना निम्भोडकर म्हणाले, तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी सेनेला आदेश दिला आणि सर्जिकल स्ट्राईकसाठी एक आठवड्याची मुदत दिली होती. त्यावेळे ज्या गावातून जायचे त्या मार्गावर रानटी कुत्री असल्याचे आमच्या लक्षात आले. हि कुत्री रात्री सैनिकांवर हल्ला करू शकतील किंवा भुंकून गाव जागे करू शकतील अशी भीती होती. मात्र बिबट्याच्या वास आला तर हि कुत्री सेक्टर मध्येच राहतात हे पाहिल्यावर आम्ही जवानांसोबत बंदुका, दारुगोळा या बरोबर बिबट्याचे मलमूत्रहि दिले होते.

हे मलमूत्र आमच्या जाण्याच्या मार्गावर टाकले गेले. त्याच्या वासाने कुत्री आली नाहीत. पहाटे तीनच्या सुमारास आमची मोहीम सुरु झाली. हि योजना इतकी गुप्त होती कि हल्ल्यात प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या सैनिकानाही कुठे हल्ला करायचा याची माहिती फक्त एकच दिवस अगोदर दिली गेली होती. आम्ही पाक हद्दीतील दहशवादी तळांचे टेहळणी करून दुर्गम भागातून जाऊन तसेच भूसुरुंगाचा सामना करत हा हल्ला केला आणि शत्रूच्या २९ जणांचा निकाल लावला होता.
———-

Leave a Comment