लेक्सस इंडियाची ‘हाइब्रिड इलेक्ट्रिक सेडान ३००’ कार भारतात लाँच!

lexus
नवी दिल्ली – हाइब्रिड इलेक्ट्रिक सेडान कार लेक्सस इंडियाने भारतात लाँच केली आहे. केवळ पाच महिन्यातच भारतात वैश्विक स्तरावर पहिल्यांदाच लाँच झालेल्या या कारला आणण्यात आले आहे. ५९.१३ लाख रुपये या कारची किंमत असून भारतात ही कार एका आकर्षक लूकमध्ये दाखल झाली आहे.

याबाबत माहिती देताना लेक्सस इंडियाचे चेअरमन एन राजा यांनी सांगितले की, आम्ही आमच्या वैश्विक लाँचनंतर अति कमी काळात भारतात एक नव्या ईएसला लाँच करण्यास उत्साही आहोत. दिसण्यास ईएस खूपच अद्भुत आहे. त्यासोबतच ही अतिशय आरामदायी सुद्धा असल्यामुळे ही कार उत्कृष्ट अंदाज देण्यासोबतच लक्झरीयससुद्घा आहे.

ईएस ३०० आपल्या डायनॅमिक परफॉर्मन्ससोबत एक उत्कृष्ट डिझाइन आणि नवीन पद्धतीनुसार एक्जीक्यूटिव्ह सेडानला पुनःपरिभाषित करण्यासाठी तयार आहे. प्रत्येक प्रवाशाला एक उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी ही कार डिझाइन करण्यात आली असून लेक्सस लक्झरीची ही कसोटी असल्याचे, लेक्सस इंडियाचे प्रेसिंडेट पी.बी. वेणूगोपाल यांनी सांगितले.

Leave a Comment