शेण आणि गोमूत्रापासून सौंदर्य प्रसाधने, साबण तयार करून ही व्यक्ती बनली आहे कोट्यधीश

cowpathy
आरोग्यासाठी गायीचे तूप, दुध चांगले असल्याचे आपल्या सर्वांच माहित आहे. तुम्ही शेणापासून बायोगॅस निर्मितीबद्दलही ऐकलेच असेल. पण एक व्यक्ती याच शेण आणि गोमूत्रापासून सौंदर्य प्रसाधने, साबण तयार करून कोट्यधीश बनली आहे. तुम्हाला अशा एका व्यापाऱ्याबद्दल आम्ही सांगत आहोत की ज्याने शेणाचा वापर करुन कोट्यावधी रुपये कमावले आहेत. गायींच्या शेण आणि गोमूत्रापासून साबण, टूथपेस्ट, क्रीम, फेस वॉश आणि अन्य कॉस्मॅटिक प्रॉडक्ट मुंबईत असलेली त्यांची कंपनी बनवते.
cowpathy1
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काऊपॅथीचे फाउंडर उमेश सोनी सांगितले की, आजाराशी लढण्याचे अनेक गुण शेणात आणि गोमूत्रात असून आयुर्वेदात पंचगाव्य म्हणजे गोमूत्र, गायीचे शेण, दूध, दही आणि तूप याद्वारे आजारांवर उपायांचा उल्लेख आहे. त्यांनी या सगळ्याच विचार करुन शेण आणि गोमूत्रापासून साबण बनविण्यास सुरुवात केली. लोकांना हळूहळू कळल्यावर या वस्तूंची मागणी वाढत गेली आणि त्यामुळे व्यवसाय वाढला.
cowpathy2
सोनी यांनी पुढे सांगितले की, लाख रुपयांची गुंतवणूक करुन त्यांनी ही कंपनी वर्ष २०१२मध्ये सुरु केली. त्यांना ही रक्कम एक्सपोर्टच्या बिझनेसमधुन मिळालेल्या फायद्याची होती. त्यांनी काऊपॅथी सुरु करण्यापूर्वी एका मित्रासोबत एक्सपोर्टचा व्यवसाय सुरु केला होता. ते याअंतर्गत कॉस्मेटिक प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करत होते. ते गायीच्या शेणापासून प्रोडक्ट बनविण्यासाठी अतिशय उष्ण तापमानात शेण वाळवतात. शेणाचा वास दूर करण्यासाठी त्यात सुगंधी तेल टाकण्यात येते. अशाच रितीने गोमूत्र उकळून त्याचा वापर वेगवेगळ्या वस्तूंमध्ये करण्यात येतो.

सोनी यांनी गायीच्या शेणापासून बनविण्यात येणाऱ्या साबणाचे पेटंट घेतले असून एकूण चार पेटंट त्यांनी घेतले आहेत. ३५ रुपये एवढी काऊपॅथीच्या या साबणाची किंमत आहे. भारतासह १३ देशात हा साबण एक्सपोर्ट करण्यात येतो. यात यूक्रेन, रशिया, अमेरिका आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे.

Leave a Comment