जॅक माचे उत्तराधिकारी म्हणून डॅनियल झँग नियुक्त

daniel-
ई कॉमर्स क्षेत्रातील बडी कंपनी अलिबाबाच्या प्रमुखपदी डॅनियल झँग यांची नियुक्ती झाली असून ते २०२० मध्ये जॅक मा यांची जागा घेणार आहेत. जॅक मा यांनी सोमवारी प्रमुखपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली असून ते पुढचे १२ महिने कंपनीचे एग्झिक्युटीव्ह चेअरमन राहणार असून या काळात डॅनियल झँग यांच्यासोबत काम करणार आहेत. डॅनियल झँग अलिबाबाची सहकंपनी ताओबाओ चे सीईओ म्हणून कार्यरत आहेत.

चीनच्या हंग्झू भागात असलेली अलीबाबा १० सप्टेंबर २०१९ ला २० वा वर्धापनदिन साजरा करणर आहे. २०२० पर्यंत जॅक मा नियामक मंडळाचे सदस्य म्हणून काम करणार आहेत. त्यानंतर ते शिक्षण क्षेत्रात काम करणार असून शिकविण्याची त्यांना खूपच आवड आहे. शेअर होल्डर आणि कंपनी कर्मचारी यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, जग खूप मोठे आहे आणि मी अजून तरुण आहे. त्यामुळे काही नवीन करून पाहण्याचा विचार करतो आहे.

Leave a Comment