बँकांच्या एनपीएसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार जबाबदार – रघुराम राजन

raghuram-rajan
नवी दिल्ली – देशातील मोठ्या बँका वाढत्या थकीत कर्जामुळे (एनपीए) अडचणीत सापडल्या असतानाच बँकांच्या एनपीएबाबत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार बँकांच्या एनपीएसाठी जबाबदार असल्याचे राजन यांनी म्हटले आहे.

राजन यांना पत्र लिहून देशातील वाढत्या एनपीएबाबत माहिती देण्यास भाजपचे ज्येष्ठ खासदार मुरलीमनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने सांगितले होते. रघुराम राजन समितीकडे पाठवलेल्या उत्तरामध्ये म्हणाले की, सरकारची निर्णय घेण्याची गती घोटाळे आणि चौकशींच्या फेऱ्यांमुळे मंदावली होती. आता त्यामुळे एनपीए वाढत गेला. आता काँग्रेसच्या अडचणी राजन यांच्या या वक्तव्यामुळे वाढण्याची शक्यता आहे.

पायाभूत विकासाच्या योजनांमध्ये २००६ पूर्वी गुंतवणूक करणे फायदेशीर होते. बँकांनी अशा परिस्थितीत बड्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले. पण मोठ्या कर्जांवर बँकांकडून उचित कारवाई करण्यात आली नाही. २००६ नंतर विकासाचा वेग कमी झाल्याने बँकांच्या वृद्धीची आकडेवारी ही अवास्तविक झाल्याचे राजन म्हणाले.

Leave a Comment