स्वीच ब्लेड उडत्या कारसाठी ८०० जणांनी केली नोंदणी

switch
ताशी ३०५ किमी वेगाने हवेतून आणि ताशी २५७ किमी वेगाने जमिनीवरून धावू शकणाऱ्या स्वीच ब्लेड कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. हि कार बाजारात येण्यापुर्वीच जगभरातून ८०० ग्राहकांनी तिची नोंदणी केली आहे. यात एकट्या अमेरिकेतील ४६ ग्राहकांचा समावेश आहे.

सॅमसन स्काय कंपनीने ही कार बनविली आहे. तिचा आकार छोट्या विमानाप्रमाणे असून त्यात दोन जणांची बसण्याची सोय आहे. या कार ला चार सिलिंडर इंजिन दिले गेले आहे. या कारसाठी टेक ऑफ घेताना ११०० फुट तर लँड होताना १६०० फुट जागा लागते आणि या कार साठी ती एक समस्या आहे. वैयक्तिक पातळीवर ग्राहक एवढी जागा कशी मिळवू शकणार असा सवाल केला जात आहे.

Leave a Comment