नासाचा डॉन मोजतोय शेवटच्या घटका

nasa
नासाचा डॉन आता शेवटच्या घटका मोजत असल्यची खबर आहे. अर्थात हा डॉन म्हणजे कोणी गुंड गुन्हेगार नाही तर तर ते एक अंतराळ यान असून २७ सप्टेंबर २००७ रोजी ते अंतराळात सोडले गेले होते. सेरेस आणि वेस्टा या दोन लघु ग्रहांची निरीक्षणे करण्याची महत्वपूर्ण कामगिरी त्याने पार पाडली आहे. मात्र आता त्याच्यातील इंधन संपत आल्याने या महिन्यात अथवा ऑक्टोबर सुरवातीला हे यान निकामी बनणार आहे. म्हणजेच त्याची अखेर होणार आहे.

दोन लघुग्रहांच्या कक्षेत जाऊन त्यांची निरीक्षणे नोंदविणारे हे नासाच्या इतिहासातील पहिले यान असून त्याने त्याचे काम यशस्वी केले आहे. १९ जुलाई २०११ ला ते वेस्टाच्या कक्षेत दाखल झाले आणि त्याची प्रदक्षिणा सुरु झाली. २०१५ ला ते सेरेस या लाघुग्रहाच्या कक्षेत दाखल झाले होते. या ग्रहांवरील अनेक जागांचे फोटो या यानाने नासा कडे पाठविले होते. त्यानंतर ते उल्का बेल्ट मध्ये पाठविले गेले होते.

हे यान इंधन संपल्यावर सेरेसचा कक्षेतच असेल आणि तेथे वातावरण नसल्याने किमान दोन दशके ते नष्ट होणार नाही असे समजते. मात्र इंधन संपल्यामुळे त्याचा पृथ्वीशी संपर्क राहणार नाही.

Leave a Comment