गुरुद्वारा करतारपूर साहिबला व्हिसा शिवाय जाता येणार

kartar
शीख धर्मियांचे गुरु नानकसाहिब यांनी जेथे देह ठेवला त्या पवित्र गुरुद्वारा करतारपूर साहिब येथे जाण्यासाठी भारतीय भाविकांना व्हिसाची गरज लागणार नाही. हा गुरुद्वारा सध्या पाकच्या हद्दीत असून रावी नदीच्या काठावर आहे. अध्या भारतीय सीमेवर असलेल्या बाबा नानक स्थित बाबा सैन रंधावा येथून दुर्बिणीतून शीख भाविक या गुरुद्वाराचे दर्शन करतात. मात्र आता पाक सरकारने हा कॉरीडॉर खुले केला जात असल्याचे घोषणा केली आहे.

शीख समाजात करतारसाहिब गुरुद्वाराला अनन्यसाधारण महत्व आहे कारण गुरु नानक यांच्या समाधीवर तो बनविला गेला आहे. १५२२ मध्ये गुरु नानक येथे राहिले आणि तेथेच शेती करू लागले. त्यानंतर त्यांचा परिवार येथे आला होता. लंगर म्हंजे अन्नछत्राची सुरवात येथूनच झाली असेही सांगितले जाते. अनेक शीख धर्मग्रंथात या जागेचा उल्लेख आहे. लंगरची सुरवात केलेल्या गुरु नानकानी हि अशी एक जागा निर्माण केली होती जेथे आजही महिला पुरुष असा भेट केला जात नाही आणि महिला पुरुष एकत्र जेवण करू शकतात.

गुरु नानक यांच्या निधनानंतर येथे त्याकाळी १ लाख ३५ हजार रु. खर्चून गुरुद्वारा बांधला गेला. हा खर्च पतियालाचे महाराज भूपिंदरसिंह यांनी केला होता.

Leave a Comment