आली टाटाची नेक्सॉन क्रेझ

Tata
नवी दिल्ली – आपल्या पहिल्या वर्षपूर्तीचे निमित्त साधून टाटा मोटर्सने नेक्सॉन या कारचे क्रेझ एडिशन मॉडेल लाँच केले आहे. ७.१४ लाखांपासून ‘टाटा नेक्सॉन क्रेझ’ या पेट्रोल कारची किंमत सुरू होणार आहे. तसेच ८.०७ लाख रुपयांपासून डिझेलवर चालणारी ही कार मिळणे शक्य होणार आहे.

वेगवेगळे फिचर्स या नवीन कारमध्ये देण्यात आले असून टाटा नेक्सॉन क्रेझची विक्री सुरू झाली आहे. टाटाची नेक्सॉन कार आतापर्यंत सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली आहे. १० वेगळे बदल टाटा नेक्सॉन क्रेझच्या नवीन व्हर्जनमध्ये करण्यात आले आहेत. TROMSO ब्लॅक कलर स्किम या कारमध्ये पाहायला मिळेल. नियो ग्रिन ट्रीटमेन्ट गाडीच्या आतमध्ये असणार आहे. कारमधील सिटचा कलर नियो ग्रिन असेल, याचबरोबर डॅशबोर्ड, पियानो ब्लॅक डोअर, कंसोल फिनिशिंग आणि ४ स्पिकर इंफोटेनमेंट सिस्टिम पाहायला मिळणार आहे.

प्रोजेक्टर हेडलॅम्प, इलेक्ट्रीक फोल्डींग रिअर व्यू, फ्लॉटिंग डॅशटॉप टचस्क्रीन, व्हॉइस कमांड, व्हॉईस अलर्ट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ड्राईव्ह अवे लॉकिंग फीचर, हाईट अॅडजस्टेबल ड्राइवर सीट आणि सीटबेल्ट्स, रिअर एसी वेन्ट्स आणि डोर ट्रिमवर फॅब्रिक इन्सर्टसारखे फीचर्स नव्या व्हेरिएंटमध्ये देण्यात आले आहेत. सबकॉम्पॅक्ट एसयूवी ग्लोबल एनसीएपीमधील क्रॅश टेस्टमध्ये टाटा नेक्सॉनला ४ स्टार मिळाले होते.

Leave a Comment