भिंतींवरील अंड्यांचे रहस्य आहे तरी काय ?

egg
या द्वीपावर येऊन समुद्रकिनारी उभे राहिले असता, या किनाऱ्याच्या कडेने बांधल्या गेलेल्या कठड्यांच्या वर ग्रनाईट दगडाने बनविली गेलेली अंडी पहावयास मिळतात. यांना त्या ठिकाणी ‘एग स्टोन स्टॅच्यू’, म्हणजेच दगडाने बनलेल्या अंड्याच्या प्रतिकृती असे म्हटले जाते. जितक्या दूरवर नजर जाईल, तितक्या दूरवर हे कठडे आणि त्यावरील अंडी आपल्या नजरेस पडतात. अश्या प्रकारच्या कलाकृती क्वचितच कुठे पाहायला मिळतील. पण कठड्यांवर ठेवलेल्या या अंड्यांचे रहस्य नेमके आहे तरी काय, हे जाणून घेऊ या.
egg1
या ठिकाणी येणारे पर्यटक या कठड्यांवरील दगडी अंडी पाहून आश्चर्यचकित होतात, आणि अश्या प्रकारचे कठडे नेमके कशासाठी बनविले गेले याबद्दल स्थानिक रहिवाश्यांकडे आवर्जून चौकशी करताना पाहायला मिळतात. कठड्यांच्या वर बनलेली ही गुळगुळीत दगडी अंडी, सामान्य अंड्याच्या मानाने आकाराने मोठी आहेत. ही शिल्पे ग्रनाइट दगडाने बनलेली आहेत. ‘इगिन आई ग्लोविक’ या नावाने ओळखली जाणारी ही शिल्पे आईसलंड देशामध्ये बनलेली असून, या ठिकाणी एके काळी अस्तित्वात असणाऱ्या, पण आता लुप्त झालेल्या पक्ष्यांच्या प्रजातींचे प्रतीक म्हणून ही अंडी बनविण्यात आली आहेत.
egg2
आईसलंड येथील समुद्रकिनाऱ्यावर उभ्या आकाराच्या मोठ्या कॉन्क्रीट स्लॅब्स बनवून त्यावर ह्या अंड्यांच्या आकाराच्या दगडी प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. एके काळी या भागामध्ये अनेक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळत असत. पण आता यातील अनेक प्रजाती संपूर्णपणे लुप्त झाल्या आहेत. लुप्त झालेल्या पक्ष्यांच्या प्रजातींचे प्रतीक म्हणून २००९ साली सर्वप्रथम चौतीस अंड्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आल्या. यातील प्रत्येक अंड्यावर लुप्त झालेल्या प्रजातीचे संपूर्ण विवरण, त्या प्रजातीच्या रंगेबिरंगी पक्षांच्या चित्रासकट मांडलेले आहे. या देशाचा राष्ट्रीय पक्षी ‘djupivogur’ या पक्ष्याचे अंडे इतर सर्व अंड्याच्या मानाने मोठे आहे.

Leave a Comment