या कारागृहामधील कैद्यांना परिवारासोबत राहण्याची परवानगी, कामासाठी बाहेर जाण्याचीही मुभा

prison
कैद्यांसाठी कारागृह म्हटला, की सभोवार उंच उचं भिंती, पोलिसांचा जागता पहारा आणि अंधाऱ्या कोठड्यांमध्ये बंदिस्त असलेले कैदी असे चित्र आपल्या डोळ्यांच्या समोर उभे राहते. मात्र मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यामध्ये एक कारागृह असेही आहे, जो सामान्य कारागृहांच्या मानाने खूपच निराळे आहे, जिथे कैद्यांना त्यांना देण्यात आलेल्या शिक्षा भोगावयाच्या आहेतच, पण म्हणून त्यासाठी या कैद्यांना कोठड्यांमध्ये बंदिस्त न ठेवता, परिवारांच्या सोबत राहण्याची परवानगी देत, रोजगार मिळविण्यासाठी कारागृहाच्या बाहेर पडण्याची मुभा देखील देण्यात आली आहे.
prison1
देवी अहिल्याबाई ओपन कॉलनी असे नाव असलेल्या या कारागृहामध्ये कैद्यांना त्यांच्या परिवारासोबत राहण्यासाठी दोन खोल्यांचा संच पुरविण्यात आला असून, त्या ठिकाणी हे कैदी आपापल्या परिवारांच्या सोबत राहू शकतात. ही ओपन कॉलनी इंदोर जिल्हा कारागृहाच्या नजीक असून, या ठिकाणी शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने हा नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे.
prison2
सध्या या ओपन कॉलनीमध्ये दहा कैद्यांसाठी दोन खोल्यांचे स्वतंत्र संच उपलब्ध करवून देण्यात आले असून, त्या ठीकाणी कैदी आपापल्या परिवारांच्या सोबत राहत आहेत. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, जास्त काळ गजाआड घालविणाऱ्या कैद्यांच्या मनामध्ये समाजाच्या प्रती कटू भावना निर्माण होत असतात, या भावनांपासून कैद्यांना दूर ठेवण्याचे उद्दिष्ट या अभिनव उपक्रमाच्यामुळे साध्य होईल असे म्हटले जात आहे. हा उपक्रम इंदोर जिल्हा कारागृह प्रशासनाच्या अधीन असून, ज्या कैद्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असून ज्यांचे वर्तन चांगले आहे, अश्या कैद्यांना या ओपन कॉलनी मध्ये स्थलांतरित केले जात आहे.
prison3
येथे राहणाऱ्या कैद्यांना कारागृहाच्या बाहेर जाऊन उपजीविका मिळविण्याची देखील मुभा दिली गेली आहे. या करिता कैद्यांना सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कारागृहाच्या बाहेर पडण्याची परवानगी दिली गेली आहे. मात्र कामानिमित्त शहराच्या हद्दीबाहेर जाण्याची परवानगी त्यांना नाही.

Leave a Comment