या न्यायालयात देवांना सुनावली जाते शिक्षा

keshkal
न्यायालयात आरोपींना हजर करून शिक्षा सुनावली जाणे अथवा त्यांची निर्दोष मुक्तता होणे हे प्रकार आपल्या चांगलेच परिचयाचे आहेत. मात्र छत्तीसगडच्या बस्तर भागात एक खास न्यायालय भरते जेथे देव देवताविरुद्ध भाविक तक्रार दाखल करतात आणि न्यायनिवाडा होऊन देवानाही शिक्षा सुनावली जाते. केशकाल या ठिकाणी अति दुर्गम ठिकाणी भंगाराम देवी मंदिरात दरवषी भाद्रपद महिन्यात या न्यायनिवाडा केला जातो. दर शनिवारी देव देविविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आसपासच्या ५५ वस्त्यातून भाविक त्याच्या देवांना येथे घेऊन येतात आणि शेवटच्या शनिवारी न्याय होतो तेव्हा मोठी जत्र भरते.

yatra
या मंदिरात जाण्यासाठी १२ अति धोकादाय वळणे पार करून डोंगरावर जावे लागते. देवाविरोधात तक्रार केल्यावर देवाला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. सर्वसाधारणपणे गावावर संकट आले, साथीचे रोग पसरले, दुष्काळ पडला तर देव देवताना त्याचा दोष दिला जातो आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार केली जाते. देवाची बाजू मांडण्याचे काम पुजारी, मुखिया लोक करतात. देव दोषी ठरले तर त्यांना फाशी पासून गावात वाळीत टाकण्याच्या शिक्षा सुनावल्या जातात अथवा निर्दोष ठरवले जाते.

फाशीची शिक्षा झालेल्या देवाची मूर्ती खंडित केली जाते. वाळीत टाकण्याची शिक्षा असेल तर मूर्ती मंदिराबाहेर ठेवली जाते व वाळीत टाकण्याची मुदत संपली कि मूर्ती पुन्हा मंदिरात नेली जाते. असे सांगतात कि फार पूर्वी खान नावाचे डॉक्टर येथे सेवाभावाने व निस्वार्थी पणाने लोकांना सेवा देत असत. त्यांच्या मृत्युनंतर ग्रामीण लोकांनी त्यांनाच देव मानले आणि भांगराम मंदिरात मूर्ती स्थापन केली. असेही सांगतात कि बस्तरच्या राजाला स्वप्नात या देवीने तुझ्या गावात राहायला येथे असे सांगितले. देवी येताना पुरुष वेशात घोड्यावरून आली व नंतर तिचे स्त्रीत रुपांतर झाले. हि प्रथा अनेक वर्षे सुरु आहे असेही समजते.
————-

Leave a Comment