आईस्क्रीमचा १७५ वा वाढदिवस

icecream
आईस्क्रीम या लोकप्रिय पदार्थाचा इतिहास खूप जुना आणि मनोरंजक आहे. अनेक देश आईस्क्रीम चा शोध सर्वप्रथम त्यांनीच लावल्याचा दावा करतात मात्र त्यसाठी कागदोपत्री पुरावे दिले जात नाहीत. अल्मनाक डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार फिलाडेल्फियातील नान्सी एम जॉन्सन हिने ९ सप्टेंबर १८४३ साली पहिले आईस्क्रीम मशीन वापरात आणले आणि त्याचे पेटंट मिळविले होते.

नान्सीने बनविलेल्या या पहिल्या मशीनमध्ये एक कृत्रिम फ्रीझर, त्यात एक टब, सिलेंडर, झाकण, डॅशर व एक बर्फ फोडण्यासाठी क्रशर होता. आजही आईस्क्रीम मशीन मध्ये असेच डिझाईन साधारणपणे असते. मिडिया रिपोर्ट नुसार आईस्क्रीमचा इतिहास खूप जुना असून रोमन सम्राट निरो याच्या भोजनात आईस्क्रीम हे मुख्य पक्वान असायचे. त्यात मध, फळे असे अनेक पदार्थ वापरले जायचे. आणखी एका दाव्यानुसार चीनच्या शांग राजवंशाचा राजा तंग याने ६१८ इसवी मध्ये आईस्क्रीम बनविण्यासाठी खास ९४ आचारी ठेवले होते. ते बर्फ फोडून त्यात विविध पदार्थ घालून आईस्क्रीम बनवीत असत.

Leave a Comment