व्यापाऱ्यांचा २८ सप्टेंबरला ‘वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करारा’विरोधात ‘भारत बंद’

deal
नवी दिल्ली – कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करारावर बोलताना सांगितले, की व्यापाऱ्यांचे या करारातील सध्याच्या तरतुदींमुळे नुकसान होणार असून स्थानिक दुकानदारांचा व्यवसाय डबघाईस येण्याची शक्यता आहे.

२८ सप्टेंबरला या कराराच्याविरोधात कॅटने (कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) भारत बंदची घोषणा केली आहे. १ कोटी व्यापारी यामध्ये सहभागी होतील. येथेच हा विरोध थांबणार नसून व्यापाऱ्यांनी यापुढेही आंदोलनाची भविष्यातील रुपरेषा ठरवल्याची माहिती दिली आहे. रामलीला मैदानात येत्या १६ डिसेंबरला व्यापारी भव्य रॅली काढणार आहेत. धरणे आंदोलन तोपर्यंत सुरुच राहणार, अशी माहिती कॅटने दिली आहे.

यावर बोलताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल हे म्हणाले, की सरकारला व्यापाऱ्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. पण सरकार व्यापाऱ्यांकडे वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराच्या मुद्द्यावरुन दुर्लक्ष करत आहे. फ्लिपकार्टचा ७७ टक्के समभाग अमेरिकेची दिग्गज कंपनी वॉलमार्ट कंपनीने १६ अब्ज डॉलरमध्ये विकत घेतल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Leave a Comment