क्रिकेटचा भगवान सचिन तेंडूलकर आणि डॉक्टर अंजली तेंडूलकर यांची लाडकी कन्या सोशल मिडीयावर अनेक कारणांनी चर्चेत असते. आता ती नव्या कारणाने चर्चेत आली आहे. सारा पदवीधर झाली असून तिने पदवी समारंभाचे काही फोटो तिच्या इंटरनेट अकौंटवर शेअर केले आहेत.
सारा तेंडूलकर पदवीधर झाली
युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या एका कॉलेजातून साराने तिचे शिक्षण पूर्ण केले असून तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून झाले आहे. तिच्या पदवीदान समारंभासाठी सचिन आणि अंजली उपस्थित होते. साराच्या पोस्ट वर शुभेच्छांचा पाउस पडला आहे. सचिन तेंडूलकरचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले आहे तर अंजली डॉक्टर आहे.