लवकरच शंभरी गाठणार इंधन ?

petrol
नवी दिल्ली – सध्या इंधन दरवाढीचा भडका देशात सुरुच असून त्याचा परिणाम म्हणून शुक्रवारी मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत ८७.३९ रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ७६.५२ रुपये प्रति लिटर झाली आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांची पुरती दमछाक झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सतत वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती इंधन दरवाढीमागे जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर अनुक्रमे ७९.९९ रुपये प्रति लिटर आणि ७६.५१ रुपये प्रति लिटर राहणार आहेत. आज दिल्लीमध्ये गुरुवारच्या तुलनेत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे ०.४८ पैसे आणि ४.९६ रुपयांची वाढ झाली. तर, मुंबई येथील पेट्रोल-डिझेलच्या दरात अनुक्रमे ०.४८ पैसे आणि ०.५६ पैशांची वाढ नोंदवण्यात आली. इंधनदरात होणाऱ्या वाढीमुळे लवकरच शतक गाठण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment