फेसबुक, ट्विटरचे अमेरिकेतील निवडणुकांमध्ये विदेशी हस्तक्षेप रोखण्याचे आश्वासन

combo
वॉशिंग्टन – फेसबुक आणि ट्विटरच्या अधिका-यांनी अमेरिकन काँग्रेसला निवडणुकीतील विदेशी हस्तक्षेप कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. आपल्या वेबसाइटला २०१८ च्या मध्यावधी निवडणुका आणि त्यानंतरच्या निवडणुकीत होणा-या हस्तक्षेपाविरोधात अधिक सुरक्षित करण्यासाठी नवी प्रणाली विकसित करणार असल्याचे स्पष्ट केले.

सीनेटच्या गुप्तचर समितीसमोर फेसबुकचे उच्च अधिकारी शेरिल सेंडबर्ग आणि ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जैक डोरसे यांनी साक्ष दिली. अल्फाबेट (गुगल) या कंपनीने यावेळी आपला उच्च अधिकारी पाठवण्यास नकार दिला होता. केवळ २ महिने मध्यावधी निवडणुकीला राहिले असल्याने या कंपन्यांना काँग्रेसने विदेशी हस्तक्षेप रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याचे आदेश दिले होते. यावेळी, पत्रकारांशी बोलताना ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोरसे यांनी राष्ट्रपती ट्रंप यांच्या पक्षपाती असल्याच्या आरोपाचे खंडन केले.

Leave a Comment