हिमालयाच्या कुशीत फुलले स्वर्गीय ब्रह्मकमळ

kamal1
हिमालाच्या कुशीत समुद्रसपाटीपासून १० हजार फुट उंचीवर १४ वर्षातून एकदाच उमलणारे स्वर्गीय ब्रह्मकमळ फुलले असून हे नयन सुख घेण्यासाठी देश विदेशातील पर्यटक हिमालात विविध ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. हे फुल १४ वर्षातून एकदाच फुलते आणि फक्त रात्रभर ते उमललेले असते आणि सकाळ होताच त्याच्या पाकळ्या मिटून जातात. भारत तिबेट सीमा पोलिसांनी या फुलाचे फोटो जारी केले आहेत.

kamal
उत्तराखंड राज्याचे हे राज्यपुष्प आहे. या फुलाला विविध नावे आहेत. उत्तराखंड मध्ये त्याला ब्रह्मकमल नावने ओळखले जाते तर हिमाचल मध्ये त्याला दुधफुल, काश्मीर मध्ये गलगल असे नाव आहे. चीनमध्येही हिमालय भागात हि फुले येतात. भारतात बदरीनाथ, केदार, रुपकुंड, हेमकुंड, वासुकीताल, बुग्याल, मधमेश्वर, तुंगनाथ परिसरात दिसते, केदार येथे पोलिसांनी या फुलाची वाटिका तयार केली आहे. हे फुल महादेवाचे प्रिय मानले जाते आणि त्यात अनेक औषधी गुण आहेत. कॅन्सरवर वाळलेल्या फुलांचा उपयोग करून औषधे बनविली जातात.

या फुलाच्या विविध ३१ जाती आहेत. जुलै ते सप्टेंबर हा या फुलांचा सिझन आहे. उत्तराखंड सरकारने या फुलाची तसेच अन्य दुर्मिळ फुलांची बीज बँक तयार करण्याचे काम हाती घेतले असून ब्रह्मकमल हि संरक्षित प्रजाती आहे.

Leave a Comment