अमेरिकेच्या मेरीलँड सैन्य विभागाच्या संदेश दळणवळण, इलेक्टॉनिक संशोधन विकास केंद्राने लेझर बीमच्या सहाय्याने उडत्या ड्रोनची बॅटरी हवेतच चार्ज करता येईल असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे ड्रोन चार्जिंग साठी जमिनीवरील बेसवर आणण्याची गरज राहणार नाही आणि हि ड्रोन हवेत अधिक काळ उडू शकणार आहेत.
हवेतच लेझर बीमने चार्ज होणार ड्रोनची बॅटरी
आजकाल गस्त घालणे, हेरगिरी, रेस्क्यू ऑपरेशन, शोध अश्या अनेक कामांसाठी लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर केला जातो. मात्र ड्रोनचे वजन कमी राहावे यासाठी बॅटरीचा आकार छोटा असतो आणि त्यामुळे हि द्रोण हवेत अर्धा ते एक तास उडू शकतात. आता ड्रोनची बॅटरी लेझर बीम वापरून हवेतच चार्ज करता येणार असल्याने हि ड्रोन दीर्घकाळ काम करू शकतील. अर्धा किमी परिसरात उडत असलेली ड्रोन या तंत्राने चार्ज करता येणार आहेत. सोलर पॅनल ज्याप्रमाणे सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करते त्याच प्रकारे हे काम होणार आहे. विशेष म्हणजे बॅटरी चार्ज होत असताना ड्रोन हवेत एका जागी स्थिर असण्याची गरज यात नाही असेही समजते.