अॅमेझॉन बनली दुसरी ट्रिलियन डॉलर कंपनी

amazon
नवी दिल्ली – एक ट्रिलियन डॉलरचा भलामोठा उलाढालीचा टप्पा अॅमेझॉन कंपनीने गाठला असून अॅपलनंतर हा आकडा गाठणारी अॅमेझॉन ही दुसरी कंपनी बनली आहे.

अहवालानुसार अॅमेझॉनचे समभाग सकाळच्या सत्रात १.५ टक्क्याने वधारल्यामुळे कंपनीच्या बाजार भाव एक ट्रिलियनपर्यंत पोहोचला. गेल्या महिन्यात अॅपलने १ ट्रिलियनचा आकडा गाठला होता. अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस यांची संपत्ती १५० अब्ज डॉलर्स एवढी आहे. रिटेल उद्योगाच्या प्रत्येक आघाडीवर व्यापार वाढवण्यासाठी अॅमेझॉनने गुंतवणूकदरांना उत्तमरित्या आकर्षित केले आहे. हा आकडा गाठण्यासाठी अॅपलला ३८ वर्षे लागली तर अॅमेझॉनने हा आकडा केवळ २१ वर्षात गाठला.

Leave a Comment