ही आहेत यंदाच्या वर्षामध्ये सर्वात मौल्यवान ठरलेली नाणी

coin
दर वर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी मुंबई येथे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ‘कॉइन, बँकनोट आणि फिलाटेली फेअर’ आयोजित केले गेले होते. या ठिकाणी अनेक प्राचीन, बहुमूल्य नाणी आणि मुद्रा प्रदर्शित केल्या जाऊन, ही नाणी खरेदी करून आपल्या संग्रही जतन करून ठेवण्याची संधीही या नाण्यांच्या आणि मुद्रांच्या लिलावामार्फत इच्छुकांना दिली गेली. त्यामुळे जुनी नाणी आणि मुद्रांचे संकलन करण्याचा छंद आणि शौक असणाऱ्यांच्या करीता ही एक पर्वणीच होती. या ठिकाणी अतिशय प्राचीन, आणि मौल्यवान नाण्यांचा, आणि मुद्रांचा लीलाव करण्यात आला.
coin1
समुद्रगुप्त कालीन, ‘अश्वमेध’ नामक सुवर्णमुद्रा सहा लाख रुपये किंमतीची ठरली. या सुवर्णमुद्रेला ‘दिनार’ म्हंटले जात असे. अतिशय सुंदर कलाकुसर असलेली ही सुवर्णमुद्रा चौथ्या ते सहाव्या शतकातील असल्याचे समजते. हे सुवर्णमुद्रा प्राचीन असल्याने तिचे मूल्य सर्वाधिक, म्हणजेच सहा लाख रुपयांचे ठरले आहे. १५२१ ते १५५७ सालापर्यंत जॉन(तिसरा) याचे पोर्तुगालवर अधिपत्य होते. त्याच्या अधिपत्याखाली पोतुगीझांच्या साम्राज्याचा विस्तार ब्राझील आणि आशियाखंडापर्यंत होता. भारतामध्ये पावले घट्ट रोवण्याच्या उद्देशाने पोर्तुगालने मसाल्यांच्या निर्यातीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळविले. त्याकाळी मसाल्यांच्या सोबत, नाण्यांना देखील मोठी मागणी असल्याने पोर्तुगीझांनी १५३० साली कोचीन येथे टांकसाळ सुरु केली. या टांकसाळीमध्ये जॉन( तिसरा) च्या नावाने तयार झालेल्या सुवर्णमुद्रेला देखील सहा लाख रुपयांची किंमत मिळाली.
coin2
राष्ट्रकूटचे राजे कृष्णा(दुसरे) कालीन सुवर्णमुद्रा अतिशय दुर्मिळ समजली जाते. त्याकाळी भारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर राष्ट्रकूट साम्राज्य असल्याने येथून होणाऱ्या व्यापारावर देखील त्यांचेच नियंत्रण होते. ‘गरुड’ हे राष्ट्रकूटाचे राजचिन्ह असून, या सुवर्णमुद्रेवरही कमळावर विराजमान असलेला गरुड कोरलेला आहे. लिलावामध्ये या नाण्याची विक्री होऊ शकली नसली तरी या मुद्रेसाठी तब्बल सात लाख रुपयांची बोली लावली गेली होती. जहांगीर कालीन सुवर्णमुद्रा जगभरातील प्राचीन आणि बहुमूल्य मुद्रांपैकी एक समजली जात असून, ही सुवर्णमुद्रा बऱ्हाणपूर येथील टांकसाळीमध्ये तयार केली गेली आहे. या सुवर्णमुद्रेला प्रदर्शनामध्ये ४.१ लाख रुपयांची किंमत मिळाली.
coin3
शाह आलम(दुसरा) मुघल साम्राज्याचा सतरावा सम्राट होता. १७५९-१८०६ या कालावधीच्या दरम्यान त्याचे अधिपत्य होते. शाह आलम च्या नावाने तयार केलेली रजतमुद्रा सरहिंदमधील टांकसाळीमध्ये तयार करण्यात आली होती. पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा जय झाल्यानंतर त्यांनी सरहिंद काबीज केले. त्यानंतर त्यांनी शाह आलमच्या नावाने ही रजतमुद्रा बनवविली होती. या रजतमुद्रेला प्रदर्शनामध्ये १.७ लाख रुपये इतकी किंमत मिळाली.