अवघ्या ९९९ रुपयांत इंडिगो घडवणार देशांतर्गत विमानप्रवास

indigo
इंडिगो एअरलाइन्स या कंपनीने एक ऑफर आणली असून १० लाख विमान तिकिटांच्या विक्रीसाठी इंडिगोने सेल सुरू केला आहे. तिकिटाची किंमत या सेलमध्ये अवघ्या ९९९ रुपयांपासून सुरू होत आहे. देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकिटाची किंमत ९९९ रुपयांपासून तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या तिकिटाची किंमत ३१९९ रुपयांपासून सुरू होत आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असेल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

लवकरच ९९९ रुपयांपासून तिकिटांची किंमत सुरू होत असून आमच्या नेटवर्कमध्ये कुठेही प्रवास ग्राहक करु शकतात, असे कंपनीचे मुख्य वाणिज्य अधिकारी विल्यम बोल्टर म्हणाले. तीन सप्टेंबरपासून इंडिगोच्या या सेलला सुरूवात झाली असून ६ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. हा सेल १८ सप्टेंबर २०१८ ते ३० मार्च २०१९ पर्यंतच्या विमानप्रवासासाठी आहे. या व्यतिरिक्त मोबिक्विक या अॅपद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना २० टक्के कॅशबॅकही मिळेल. कॅशबॅक जास्तीतजास्त ६०० रुपयांपर्यंतच मिळेल.

Leave a Comment