द्वारकाधीश मंदिरात पट्टराणी रुक्मीणीला का नाही स्थान?

dwarka
गुजरात मधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात कृष्ण जन्म सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. कृष्णाला १६१०० राण्या होत्या आणि ८ पट्टराण्या होत्या मात्र त्यातील रुक्मिणीवर कृष्णाचे सर्वाधिक प्रेम होते. विशेष म्हणजे कृष्ण मंदिरात नेहमी कृष्ण एकता तरी असतो किंवा राधेसोबत असतो. रुक्मिणीची मूर्ती कधीच कृष्णासोबत दिसत नाही आणि याला द्वारकाधीश मंदिर अपवाद नाही.

यामागे अशी कथा सांगितली जाते कि एका शापामुळे कृष्ण आणि रुक्मिणी यांना वेगळे राहावे लागले होते. यामुळे द्वारकेत कृष्ण मंदिरापासून २ किमी अंतरावर रुक्मिणी मंदिर आहे आणि यात रुक्मिणी लक्ष्मी स्वरुपात विराजमान आहे. १२ व्या शतकातील हे मंदिर आहे आणि येथे जल दानाचे मोठे महत्व आहे.

rukmini
या मागची कथा अशी कि यदु वंशाचे कुलगुरू दुर्वास ऋषी यांना भेटण्यासाठी कृष्ण आणि रुक्मिणी त्याच्या विवाहानंतर गेले आणि त्यांनी ऋषींना महालात भोजनास येण्याचे आमंत्रण दिले. तेव्हा दुर्वास ऋषींनी ते स्वीकारले पण एक अट घातली. ती अशी कि कृष्णने त्यांना स्वतंत्र रथातून नेले पाहिजे. कृष्णाकडे तेव्हा एकच रथ होता. म्हणून त्याने स्वतःच्या रथाचे घोडे सोडले आणि त्या रथाला स्वतः आणि रुक्मिणीने जुंपून घेतले. या रथातून दुर्वास ऋषींना महालात नेत असतात वाटेत रुक्मीणीला तहान लागली तेव्हा कृष्णाने अंगठा जमिनीत रुतवून गंगाजल निर्माण केले. हे पाणी ते दोघे प्याले पण ऋषींना त्यांनी पाणी विचारले नाही तेव्हा रागावलेल्या ऋषींनी या दोघांना शाप देऊन तुम्हाला १२ वर्षे वेगळे राहावे लागेल तसेच जेथे तुम्ही गंगा आणली तो भाग उजाड होईल असे सांगितले.

Leave a Comment