दीर्घ काळानंतर रिझर्व बँकेने केली सोनेखरेदी

goldrbi
रिझर्व बँक ऑफ इंडियाने तब्बल ९ वर्षानंतर प्रथमच ८.४६ टन सोने खरेदी केली असल्याचे बँकेच्या वार्षिक अहवालात नमूद केले गेले आहे. यापूर्वी बँकेने २००९ मध्ये नाणेनिधी कडून २०० टन सोने खरेदी केली होती. नव्या खरेदीमुळे ३० जून २०१८ पर्यंत बँकेकडे असलेला सोने साठा ५६६.२३ टन झाला आहे. ३० जून २०१७ रोजी हा साठ ५५७.७७ टन होता.

बँकेच्या अहवालानुसार या एकूण सोने साठ्यापैकी २९२.३० टन सोने नोटा जारी करणाऱ्या विभागाची संपत्ती म्हणून दाखविला गेला आहे तर उर्वरित २७३.९३ टन सोने बँकिंग विभागाची संपत्ती म्हणून दाखविला गेला आहे. बँकिंग विभागाची संपत्ती महणून दाखविल्या गेलेल्या सोने साठ्याचे मूल्य ६९६७४ कोटी रुपये आहे.

Leave a Comment