लढाऊ एफ १६ विमानांना टाटा देणार पंख

f16
अमेरिकन कंपनी लॉकहिड मार्टिनच्या एफ १६ या लढाऊ विमानाचे पंख भारतात मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत तयार होणार असून यासाठी टाटा अॅडव्हान्स सिस्टीम बरोबर सहकार्य करार केला गेला असल्याचे लॉकहीड मार्टिन कंपनी अधिकार्यांनी मंगळवारी अमेरिकेत जाहीर केले आहे. अर्थात यासाठी भारत सरकारला विमान खरेदी संदर्भात कोणतीही अट घातली गेली नसल्याचा खुलासा कंपनीने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लॉकहिड मार्टिन ने यापूर्वीच सी १३० जे सुपर हर्क्युलस विमाने आणि एस ९२ हेलिकॉप्टर साठी टाटा बरोबर सहकार्य करार केला आहे. भारतीय हवाई दलाने एफ १६ ब्लॉक ७० हेलिकॉप्टर ची खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर टाटा समूहाच्या सहकार्याने हि विमाने भारतातच उत्पादन करण्यात येतील अशी घोषणा गतवर्षी केली गेली होती. मेक इन इंडिया साठी हे मोठे योगदान ठरेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Leave a Comment