चीनमधील कंपनीने कर्मचाऱ्याला बोनसमध्ये दिली चक्क पोर्नस्टार

bonus
बीजिंग – कंपनीमधील प्रोमोशन, पगारवाढ आणि बोनससाठी प्रत्येक कर्मचारी जीव तोडून मेहनत करत असतो. यात आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी कंपन्या सुद्धा दरवर्षी पगारवाढीसह बोनस आणि इन्सेंटिव्हची घोषणा करत असतात. आपल्या कर्मचाऱ्यांना हे बोनस आणि इन्सेंटिव्ह कंपन्या पैसे किंवा शेअर्सच्या स्वरुपात देतात. पण याबाबतीत चीनच्या एका कंपनीने हद्दच पार केली आहे. यात जे कर्मचाऱ्याला मिळाले त्याने त्याचा कधी विचारही केला नसेल.

चीनच्या शांघाय येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला बोनसमध्ये प्रसिद्ध पॉर्नस्टारसोबत एक रात्र घालवण्याची संधी दिली. वार्षिक परफॉर्मन्सनुसार कंपनीने कर्मचाऱ्यांची यादी तयार केली. एका कर्मचाऱ्याला त्यामध्ये इतरांच्या तुलनेत बेस्ट मानले. कंपनीला त्याच्या एकट्याच्या मेहनतीमुळे करोडोंचा फायदा झाला होता. कंपनीला अनेक डील त्याने मिळवून दिल्या. कंपनी त्यावर एवढी खुश झाली की जपानची एका प्रसिद्ध पॉर्न स्टार Julia Kyoka सोबत रात्र घालवण्याचे बोनस त्यांनी त्या कर्मचाऱ्याला दिले. जपानच्या एका पॉर्न स्टारसोबत एक रात्र घालवण्याची व्यवस्था झाल्याची घोषणा करण्यात आली. सोशल मीडियावर या घटनेवर सगळेच चकित आहेत. काहींनी कंपनीचे कौतुक केले तर काहींनी त्यावर टीका केली.