गंभीर अपघात झाल्यानंतरही मोबाईलवर गेम खेळण्याचा उत्साह कायम !

game
आजकाल ज्याच्या त्याच्या हातामध्ये मोबाईल दिसणे अगदी सामान्य बाब झाली आहे. काही जणांना मोबाईल फोन इतका महत्वाचा वाटतो, की दर दोन मिनिटांनी एकदा मोबाईल फोनवरील मेसेजेस वाचल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. अश्या व्यक्ती आगी मध्यरात्री देखील आपले फोनवरील मेसेज पाहत असतात. मेसेजेस पाहण्यासोबतच अनेकांना मोबाईल फोन वर गेम्स खेळण्याचे व्यसन असते. ही मंडळी घरामध्ये, घराबाहेर, आणि अगदी रस्त्याने चालताना देखील मोबाईल फोनवर गेम्स खेळण्यामध्ये मश्गुल असतात.
game1
पण अलीकडे चीनमधील एका इसमाचे मोबाईल फोनवर गेम्स खेळण्याचे वेड जेव्हा लोकांनी पाहिले, आणि त्या घटनेबद्दलचे वृत्त ज्यांनी प्रसारमाध्यमांतून किंवा सोशल मिडीयाद्वारे वाचले, त्यांच्या मनामध्ये या माणसाचे कौतुक करावे, की त्याच्या या वेडाबद्दल संताप व्यक्त करावा, असा संभ्रम निर्माण झाला. ही घटना इतकी विचित्र आहे, की त्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सर्वसाधारणपणे जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, तर ती व्यक्ती सर्वात आधी वैद्यकीय मदत मिळविण्याचा प्रयत्न करते. पण चीनमध्ये घडलेल्या भीषण अपघातामध्ये, लोखंडाचा रॉड छातीतून आरपार होऊनही, रुग्णवाहिनी येईपर्यंत या इसमाला आपल्या मोबाईल फोनवर गेम्स खेळण्याचा उत्साह आवरता आला नाही. ही घटना चीनमधील लियोयांग नामक ठिकाणची आहे.
game2
या व्यक्तीची अवस्था, त्याच्या छातीतून आरपार निघालेला तो लोखंडी रॉड पाहून, तिथे जमेलेल्या लोकांचा जीव घाबरा होत होता. पण हा इसम मात्र तशाही अवस्थेमध्ये शांतपणे आपल्या मोबाईल फोनवर गेम्स खेळत होता. या इसमाच्या गाडीला एका गार्ड रेलने धडक दिल्यानंतर त्या इसमाच्या छातीतून एक चार मीटर लांबीचा लोखंडी रॉड आरपार घुसला. जखमेतून रक्तस्राव सुरु झाला. घडला प्रकार पाहून आसपासच्या लोकांनी रुग्णवाहिनीला पाचारण केले. मात्र रुग्णवाहिका येईपर्यंत हा इसम आपल्या मोबाईल फोनवर गेम्स खेळत राहिला.
game3
घडल्या प्रकारची छायाचित्रे चीनमधील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. एकीकडे काही लोक या व्यक्तीच्या हिंमतीची दाद देत आहेत, तर दुसरीकडे त्याचे मोबाईल फोन वर गेम्स खेळण्याचे हे व्यसन हाताबाहेर गेले असल्याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या इसमाला नेण्यासाठी जेव्हा रुग्नावाहिनी आली, तेव्हा परिचारक त्याला रुग्णवाहिनीमध्ये हलवत असताना देखील हा इसम फोनवर गेम्स खेळण्यात मग्न होता.

Leave a Comment