ही आहे जगातील तोंडातून गर्भधारणा झालेली पहिली महिला

pregnancy
सेऊल – तोंडातून गर्भधारणा झाल्याचे जगातील पहिले प्रकरण समोर आले असून डॉक्टर आणि संशोधक सुद्धा दक्षिण कोरियाच्या एका महिलेची चाचणी केली असता हैराण आहेत. ही गर्भधारणा तिच्या तोंडातच झाली आहे. याबाबत एका मेडिकल जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, स्क्वि़डने (सागरी जीव) दक्षिण कोरियात राहणाऱ्या एका ६३ वर्षीय महिलेच्या तोंडात आपले स्पर्म सोडले. तिच्या जिभेखाली आणि हिरड्यांमध्ये त्यातूनच १२ पिल्ले तयार झाले होते. ही घटना २०१२ची असल्याचे जर्नलमध्ये लिहिण्यात आले आहे.

याबाबत जर्नल ऑफ पॅरासाइटोलॉजीच्या लेखनुसार, एका रेस्टॉरंटमध्ये कालामारी या महिलेने ऑर्डर दिली होती. कालामारी एक सीफूड असून ते सागरी जीव स्क्विडपासून तयार केले जाते. महिलेने सांगितल्याप्रमाणे, तिने स्क्वि़ड तोंडात ठेवले. पण, खाल्ले नाही. हे स्क्विड पूर्णपणे शिजले नव्हते, ते जिवंत होते. तोंडात ठेवताच तिला कीटक चावल्याचा भास झाला. घाबरलेल्या महिलेने वेळीच ते थुंकून दिले.

महिलेने या प्रकरणावर दुर्लक्ष केले होते. पण तिच्या तोंडात काही दिवसांनंतर तीव्र वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांची तिची वैद्यकीय चाचणी घेतली तेव्हा सर्वांना शॉक बसला. १२ पिल्ले तिच्या जीभ आणि हिरड्यांभोवती पाळली जात आहेत. तसेच तिचे तोंड गरोदर असल्याचे समोर आले. जेव्हा आपली आपबिती महिलेने सांगितली तेव्हा डॉक्टरांनी हे जगातील पहिलेच प्रकरण मानले. ती प्रत्यक्षात जे स्क्विड खाण्याचा प्रयत्न करत होती, ते नर होते. त्याने तोंडात जाताच या महिलेच्या जीभ आणि हिरड्यांमध्ये आपले स्पर्म इंजेक्ट केले होते. त्यामुळेच महिलेला आपल्या तोंडात कीटक चावत असल्याचा भास झाला होता. डॉक्टरांनी छोटीशी सर्जरी करून ते सर्व जीव बाहेर काढले आहेत.

Leave a Comment