लिंक्डइनद्वारे चिनी हेरांची घुसखोरी – अमेरिकेचा इशारा

linked-in
लिंक्डइन या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून चिनी हेर अमेरिकी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत असून त्यांची खाती बंद करावी, असे अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

चिनी गुप्तचर संस्थांनी लिंक्डइनवर अनेक बनावट खाती बनविली आहेत. त्यातून ते अमेरिकेच्या सरकारमध्ये प्रवेश असलेल्या अधिकाऱ्यांची भरती करत आहेत, असा या अधिकाऱ्याचा दावा आहे.

लिंक्डइन हे संकेतस्थळ मायक्रोसॅाफ्ट कंपनीच्या मालकीचे आहे. या संकेतस्थळावर चीनच्या अत्यंत आक्रमक कारवाया चालू असल्याबाबत अमेरिकी गुप्तचर व कायदा संस्थांनी मायक्रोसॅाफ्टला कळविले आहे, असे अमेरिकी प्रति-हेरगिरी खात्याचे प्रमुख विल्यम इव्हानिया यांनी रॅायटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

लिंक्डइनच्या हजारो सदस्यांना हे चिनी हेर संपर्क करतात, असे इव्हानिया यांनी सांगितले. मात्र किती बनावट खाती बनविल्यात आली किंवा किती अमेरिकी लोकांशी संपर्क करण्यात आला आणि यामोहिमेत चीनला किती यश मिळाले, हे त्यांनी सांगितले नाही.

यापूर्वी जर्मन व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी चीन हा लिंक्डइनचा वापर करून हेरगिरी करत असल्याचा व त्यापासून सावध राहण्याचा इशारा नागरिकांना दिला होता. मात्र अमेरिकेकडून अशा प्रकारचा इशारा पहिल्यांदाच देण्यात आला आहे.

Leave a Comment