बँका ६ दिवस बंद राहणार असल्याचे वृत्त अर्थ मंत्रालयाने नाकारले

bank
नवी दिल्ली – अर्थ मंत्रालयाने या आठवड्यात देशातील सर्व बँका ६ दिवस बंद राहणार असल्याचे वृत्त नाकारले असून ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी २ सप्टेंबर आणि दुसऱ्या शनिवारी ८ सप्टेंबरलाच फक्त बँका बंद राहणार आहेत.

अर्थ मंत्रालयाने म्हणन्यानुसार जन्माष्टमी निमित्ताने ३ सप्टेंबरला देशात सर्वच ठिकाणी सुट्टया देण्यात आलेल्य़ा नसून, ही सुट्टी काही ठरावीक राज्यांमध्येच देण्यात आली आहे. बाकी सर्व ठिकाणी बँका आपल्या नियमित वेळेत चालू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान देशातील सगळ्या राज्यांमध्ये एटीएम सेवा सुरळीत चालू राहणार असून, एटीएममध्ये पुरेसे पैसे जमा करून ठेवण्याचे निर्देश बँकाना अर्थ मंत्रालयाने दिले आहेत. त्याचबरोबर अर्थ मंत्रालयाने नागरिकांना सोशल मिडियावर पसरवल्या जात असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.

Leave a Comment