बीजिंगमधील मेट्रोत तरुणींनी चेहऱ्यावर का चिकटवले कंडोम?

condom
बीजिंगमधील मेट्रोने प्रवास करणाऱ्या एका ग्रुपमधील काही तरुणींनी आपल्‍या चेहऱ्यावर, छातीवर तर कुणी कपाळावर कंडोम चिटकवले होते. ट्रेनमधील इतर प्रवासी हा प्रकार पाहून अव्वाक झाले आणि त्यांनी असे का केले त्याबद्दल दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाली.
condom1
पण यामागचे कारण जाणून घेतले असता ही तर एक प्रसिद्धी मोहीम होती. या प्रसिद्धी मोहिमेचे आयोजन चीनच्‍या एका कंडोम कंपनीने केले होते. या मोहिमेमध्‍ये सहभागी मॉडल्सपैकी कुणी चेहऱ्यावर, कुणी छातीवर तर कुणी हातावर कंडोम चिटकवून घेतले. त्‍या अशा अवस्‍थेत ट्रेनमध्‍ये निवांत बसल्‍या असल्यामुळे या बाबत चर्चा झाली. शिवाय कंपनी कंडोम तयार करण्‍यासाठी ज्‍या लुब्रिकेंटचा वापर करते ते त्‍वचेसाठी खूप चांगले असते, असाही संदेश यांनी त्‍यातून दिला.
condom2
अशा अवस्‍थेत तरुणींना पाहून अनेकांनी आपल्‍या स्‍मार्ट फोनमध्‍ये त्‍यांचे फोटो घेतले. दरम्‍यान, सोशल मीडियामधून या प्रकाराविरोधात टीकेची झोड उठली.

Leave a Comment