मानवी कवटीसारखे दिसण्यासाठी तरुणाने कापले स्वतःचे कान, नाक !

skull
कोलंबियामध्ये राहणाऱ्या या तरुणाने आपले नाक आणि कान कापवून घेतले, कारण आपला चेहरा मानवी कवटीप्रमाणे दिसावा अशी त्याची विचित्र इच्छा होती. ही अजब इच्छा पूर्ण करविण्यासाठी त्याने आपले नाक अर्धे कापवून घेऊन दोन्ही कानही शस्त्रक्रिया करवून कापवून घेतले आहेत. त्यानंतर त्या तरुणाचा चेहरा अर्थातच अतिशय भेसूर दिसू लागला.
skull1
कोलंबिया येथे राहणाऱ्या या तरुणाचे नाव एरिक यीनर हीनकॅपी आहे. यालाच लोक ‘कालका स्कल’ या नावाने देखील ओळखतात. एरीक स्वतः टॅटू आर्टीस्ट आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये एरिकने शस्त्रक्रिया करवून स्वतःच्या शरीरामध्ये अनेक बदल घडवून आणले आहेत. या शस्त्रक्रिया अतिशय वेदना देणाऱ्या होत्या, तरीही एरिकने आपला हट्ट सोडला नाही. त्याने अनेक शस्त्रक्रिया करवून घेऊन आपला चेहरा आणि शरीरामध्ये आपल्या इच्छेनुसार परिवर्तन करवून घेतले.
skull2
केवळ कान आणि नाकाच्या शस्त्रक्रिया करवून घेऊन एरिक थांबला नाही, तर त्याने आपल्या जिभेवरही शस्त्रक्रिया करवून घेत जीभ दोन दोन भागांमध्ये कापवून घेतली. एरिकच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सर्वत्र टॅटूचे जाळे होतेच, पण इतके करूनही मन भरले नाही, तेव्हा एरिकने स्वतःच्या जिभेवरही टॅटू गोंदवून घेतले. जेव्हा एखाद्या सार्वजनिक ठीकाणी एरिक जातो, तेव्हा त्याचा हा अवतार पाहून लोक भयचकित नजरांनी त्याच्याकडे पाहत राहतात, त्याच्याशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न करतात. पण एरिकला या गोष्टींनी फारसा फरक पडत नाही. एरीक आपल्या नव्या रूपावर बेहद्द खुश आहे. त्याने आपल्या ‘मेक ओव्हर’ ची अनेक छायाचित्रे सोशल मिडीयाच्या द्वारेही प्रसिद्ध केली आहेत.
skull3
एरिकने आपल्या डोक्यावरचे केस काढून टाकून डोक्यावर अनेक ठिकाणी ‘पियर्सिंग’ करवून घेतले आहे. एरिकला टॅटू आणि पियर्सिंगचे आकर्षण अगदी लहानपणापासूनच होते. मात्र त्याची आई त्याला हे सर्व करू देत नसे. आईच्या मृत्यूनन्तर एरिकने आपली टॅटू गोंदवून घेण्याची आणि पियर्सिंग करून घेण्याची हौस पूर्ण करून घेतली आहे.

Leave a Comment