सॅनफ्रान्सिसको – आपल्या वापरकर्त्यांसाठी खास व्हिडिओ ऑन डिमांड सेवा सोशल मीडियामधील सर्वात बलाढ्य असलेल्या फेसबुक कंपनीने आणली असून फेसबुक वॉच असे या सेवेचे नाव असणार आहे. फेसबुक या सेवेतून युट्युबशी तगडी स्पर्धा करणार असल्याचे दिसून येत आहे.
फेसबुकने आणली व्हिडिओ ऑन डिमांड सेवा
याबाबत माहिती देताना फेसबुक व्हिडिओचे प्रमुख फीडजी सीमो यांनी सांगितले, की आम्ही लोकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना व्हिडिओचा नवा अनुभव देणार आहोत. लोकांना त्यामध्ये बदलही करता येणार आहेत. तुम्हाला काही काळानंतर वॉच फीडमध्ये नवा अनुभव घेता येईल, असेही ते म्हणाले. वापरकर्त्यांना या फेसबुक वॉचमधून व्हिडिओ तयार करणारे आणि ते प्रसिद्ध करणाऱ्यांशी संपर्कात जोडणे शक्य होणार आहे. ‘अॅड ब्रेक’ या व्हिडिओमध्ये असल्याने वापरकर्त्यांना पैसेही मिळू शकणार आहेत. आयओएस, अँड्राईड, अॅपल टीव्ही, समॅसंग टीव्हीवर वापरकर्त्यांना फेसबुक वॉच ही सेवा घेता येणार आहे.