४८६ खातेधारकांची खाती ट्विटरने गोठवली

twitter
सॅन फ्रान्सिस्को – ४८६ खातेधारकांची खाती ट्विटरने रद्दबातल ठरवली असून ट्विटरच्या नियमांचे हे खातेधारक उल्लंघन करत होते, असे ट्विटरकडून सांगण्यात आले. ट्विटरने याआधी देखील २८४ खाती रद्द केली होती.

ट्विटरने नुकत्याच प्रसारीत केलेल्या निवेदनात सांगितले, की मध्य पूर्व, लॅटीन अमेरिका, ब्रिटन आणि अमेरिकेच्या नागरिकांची ही खाती दिशाभूल करत होती. आम्ही गेल्या आठवड्यातच कारवाईला सुरुवात केली आहे. तेव्हापासून यांची माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. रद्द केलेल्या खात्यांची संख्या आता ७७० झाली आहे. रद्द केलेल्या ७७० खात्यांपैकी १०० खातेधारकांनी अमेरिकन असल्याच दावा केला आहे. यातील बहुसंख्य लोक विद्वषपूर्ण मेसेज पसरवत होते. सरासरी ८६७ वेळेस हे खातेधारक ट्वीट करायचे. १,२६८ लोक त्यांना फॉलो करायचे. तसेच, ही खाती एक वर्षाच्या आतील होती अशी माहिती ट्विटरने दिली. फेसबुक आणि ट्विटरने मागच्या आठवड्यात ईरान आणि रशियातील अनेक खात्यांना रद्द केले गेले. आत्तापर्यंत ६५२ पेज, ग्रुप आणि खात्यांना फेसबुकने रद्द केले होते.

Leave a Comment