आता दृष्टीहीनांना दृष्टी देणार थ्री डी प्रिंटेड बायोनिक डोळा

eye
वैज्ञानिकांनी प्रथमच वजनाला अतिशय हलके असलेले रीसेप्टर्स वापरून कृत्रिम डोळ्याचे निर्माण केले आहे. या कृत्रिम बायोनिक डोळ्याचा प्रोटोटाईप थ्री डी प्रिंटेड आहे. आगामी काळामध्ये दृष्टीहीन व्यक्तींच्या साठी हा थ्री डी प्रिंटेड बायोनिक प्रोटोटाईप वरदान ठरणार आहे.

अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठामधील शोधकर्त्यांनी हा प्रोटो टाईप विकसित करण्यासाठी एका अर्धगोलाकार घुमटाप्रमाणे दिसणाऱ्या काचेच्या प्रतिकृतीचा वापर केला आहे. इलेक्ट्रॉनिक प्रिंटींग करणे शक्य व्हावे म्हणून अश्या प्रकारच्या काचेच्या तुकड्याचा वापर करण्यात आला आहे. यासाठी खास थ्री डी प्रिंटरही वैज्ञानिकांनी तयार केला आहे. या प्रिंटरमधील शाईमध्ये ‘सिल्व्हर पार्टिकल्स’ चा वापर करण्यात आला आहे.

सध्या हा बायोनिक प्रोटो टाईप प्रायोगिक पातळीवर असून, याच्या निरनिराळ्या चाचण्या केल्या जात आहेत. अश्या प्रकारचा बायोनिक प्रोटो टाईप तयार करणे कल्पनेच्या पलीकडे मानले गेले होते. पण मिनेसोटा विद्यापीठातील शोधकर्त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरविली आहे. यासाठी खास तयार करण्यात आलेल्या थ्री डी प्रिंटरची यामध्ये मोलाची मदत होत आहे. प्रायोगिक पातळीवर असलेला हा प्रोटोटाईप लवकरच यशस्वी रित्या वापरला जाता येईल अशी खात्री शोधकर्त्यांना वाटत आहे. त्याचबरोबर दृष्टीहीन व्यक्तींना या बायोनिक डोळ्याच्या सहाय्याने आसपासचे जग दिसू लागेल याची खात्रीही वैज्ञानिकांना वाटते आहे.

Leave a Comment