तब्बल ३४१ कोटींहून अधिक किमतीची बोली जगातील सगळ्यात महागड्या गाडीसाठी

ferarri
नुकताच एक मोठा लिलाव कॅलिफोर्नियामध्ये झाला असून जगातील कारची सर्वात मोठी बोली वेगासाठी प्रसिद्ध असणाऱ्या फरारीवर लागली. १९६२ च्या Ferrari 250 GTO नावाच्या गाडीच्या मॉडेलचा लिलाव करण्यात आला असून तब्बल ३४१ कोटींहून अधिक किमतीची बोली या Ferrari 250 GTO वर लागली असून एवढी मोठी किंमत मिळाल्याने या लिलावाने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

२०१४ मध्ये एका कारचा सर्वात महागडा लिलाव याआधी झाला होता. पण Ferrari GTO ने ती बोली मागे टाकत वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. यावर इतकी बोली सर्वात साधी आणि तरीही चांगली दिसणारी कार असल्याने लागली. तसेच रेसिंग कारच्या यादीतील उत्तम कार म्हणूनही ही कार ओळखली जाते. १९६२ मध्ये इटालियन GT स्पर्धा ही कार जिंकली होती. याबरोबरच १९६२ ते १९६५ या कालावधीतील जवळपास १५ रेसिंग स्पर्धा या कारने जिंकल्या आहेत. अमेरिकेतील पहिले वर्ल्ड रेसिंग चॅम्पियन फिल हिल यांनी फॉर्म्युला वनमध्ये ही गाडी चालवली आहे.


या कारवर ३४१ कोटींहून अधिक किमतीची बोली मागील १८ वर्षांपासून मायक्रोसॉफ्टसाठी काम करणाऱ्या डॉ. ग्रेग व्हिटन यांनी लावली आहे. मायक्रोसॉफ्टची वेगवेगळी अॅप्लिकेशन्स यांनीच निर्माण केली असल्यामुळे या व्यक्तीकडे किती संपत्ती असेल याबाबत न बोललेच चांगले.

Leave a Comment